व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष

मावळ तालुक्यात असणारे गड-किल्ले, लेण्या, प्राचीन मंदिरे, समाधीस्थळे अशा अनेक गोष्टी अभ्यासकांना खुणावत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
An-Ancient-Tomb-At-Lonavala

Photo : Deepak Patekar


शिवकालीन कालखंडातील प्रमुख प्रदेश राहिलेला आणि त्यापूर्वी किंवा त्यानंतरही ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्वाचा राहिलेला मावळ प्रांत आणि मावळ प्रांतातील सध्याचा प्रमुख मावळ तालुका हा अभ्यासक, पर्यटक, विद्यार्थी यांच्या दृष्टीने नेहमीच केंद्रस्थानी राहतो. मावळ तालुक्यात असणारे गड-किल्ले, लेण्या, प्राचीन मंदिरे, समाधीस्थळे अशा अनेक गोष्टी अभ्यासकांना खुणावत असतात. सध्या लोणावळा येथीलच अभ्यासक दिपक पटेकर यांनी लोणावळा-खंडाळा भागातील मराठा साम्राज्य काळातील एका अज्ञात व्यक्तीची समाधी छत्री बद्दल केलेल्या लिखाणामुळे हे ठिकाण प्रकाशझोतात आले आहे. ( An Ancient Tomb Of An Unknown Person At Lonavala Khandala Maval Taluka Pune )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“लोणावळा-खंडाळा येथील मराठा कालखंडातील अज्ञात व्यक्तीची समाधी-छत्री

लोणावळा आणि खंडाळ्याच्या मधोमध जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या लगतच एका खाजगी गृह संकुलाच्या आवारात ही छत्री आहे. उत्तर मराठा कालखंडातील म्हणजे 18 व्या शतकातील मराठा वास्तूरचना-कलेतील ही वास्तू. आजूबाजूला बंगले होण्यापूर्वी ही छत्री लोणावळ्याकडून खंडाळ्यात जाताना उजव्या हाताला रस्त्यावरुनही थोड्या उंचीवर अगदी स्पष्ट दिसत असे, ही जागाच ह्या उद्देशाने निश्चित केली गेली असावी.

सोसायटीच्या आवारात असल्यामुळे नियमित झाडलोट व‌ स्वच्छता राखली जाते. खालील भाग सपाटीकरणासाठी बांधून घेतला असल्यामुळे खाली नेमकं काय होतं/आहे, हे कळून येत नाही. शिलालेख किंवा या वास्तूबद्दल एक शब्दही माहिती करुन घेण्याची काहीही सोय येथे नाही. ही वास्तू कोणाची, कोणी बांधली हे आजूबाजूच्या लोकांना माहित नाही. (किंवा असे म्हणता येईल की, ज्या कोणाला हे माहित असावे, त्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहचू शकलो नाही.)

ही वास्तू कोणी, केव्हा, कोणासाठी, का बांधली या प्रश्नार्थक ‘क’ चे कोडे लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहुयात किती यश मिळते ते! लोणावळा-खंडाळा परिसरात मराठा कालखंडातील एक सुंदर वास्तू आहे. ठिकाण – रहेजा सोसायटी, मयूर रेट्रीट जवळ, जुना मुंबई पुणे रस्ता. (सुचना – खाजगी बंगल्यांच्या सोसायटीच्या आत हे स्मारक असल्याने, आत जाण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक.) – दिपक पटेकर (9527671678)”

अधिक वाचा –

– मावळ तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखड्याचे काम हाती, खासदार बारणे यांची माहिती
– मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी, वाचा एका क्लिकवर


Previous Post

मावळ तालुक्यातील आदिवासी कुटुंबाला परभणीत मारहाण, जीव मुठीत धरून गावी परतले – पाहा व्हिडिओ

Next Post

परीक्षा पे चर्चा 2023 : पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा गुरुमंत्र, वडगावमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाहिला कार्यक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pariksha-Pe-Charcha-2023

परीक्षा पे चर्चा 2023 : पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा गुरुमंत्र, वडगावमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाहिला कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP Subhash Jadhav elected as chairman of Maval Taluka Agricultural Produce Market Committee NCP shocked

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड

March 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

द्रुतगती मार्गावरील ३० तासांच्या वाहतूक कोंडीची समितीकडून चौकशी सुरू ; मुंबई-पुणे मिसिंग लिंक मे महिन्यात खुला करण्याचे नियोजन

March 26, 2026
CM and both Deputy Chief Ministers distributed eighth installment of Shetkari Mahasamman Nidhi Yojana

शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण

March 26, 2026
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे ? RTO कडून एप्रिल महिन्याचे वेळापत्रक जाहीर – पाहा आवश्यक कागदपत्रे

March 26, 2026
A beacon of historical research has been lost Senior historian Dr Jaysingrao Pawar Passes Away

Dr Jaysingrao Pawar Passes Away : इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला ! ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

March 26, 2026
Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.