आज (शुक्रवार, दिनांक 26 मे) रोजी सकाळी 10 वाजण्यापूर्वी कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशनदरम्यान एक 20 वर्षीय तरुणीचा रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. रे.की. नं. 138 / 01 अपलाईन जवळ कोणत्या तरी रेल्वेतून पडून अथवा धावत्या रेल्वेची धडक बसून मृत्यू झाल्याच्या अवस्थेत सदर मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मयताचे वर्णन – अंगाने सडपातळ, रंगाने गोरी, कपाळ मोठे, उंची पाच फूट, चेहरा उभट, डोळे काळे, डोक्याचे केस काळे लांब व वाढलेले. तसेच, सदर मृत मुलीच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ इंग्रजीत पी (P) अक्षर गोंदलेले आहे. व डाव्या हाताच्या मनगटावर तीन ताऱ्यांचा टॅटू आहे.
सदर मृत महिलेच्या अंगावर – काळ्या पिवळ्या चेक्सचा फुल बाह्यांचा शर्ट त्यावर अटीट्युड असे इंग्रजी नाव आहे. तसेच काळ्या रंगाची ट्रॅकपँट आहे.
सदर मृत महिलेविषयी कुणाला काही माहिती असल्यास किंवा तिच्या ओळखीचे कोणी असल्यास रेल्वे पोलिस एस. ई. सावंत यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( an unidentified girl died after falling from running train between Kamshet to Malvali railway station )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 90.55 टक्के, कोणत्या महाविद्यालयाचा किती टक्के निकाल? वाचा सविस्तर
– आमदार सुनिल शेळकेंसाठी रविवारी वडगावमधील पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक