आज गुरुवार (दिनांक 1 जून) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान एका अनोळखी महिलेचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या महिलेचे वय अंदाजे 60 वर्षे आहे. ( an unidentified woman dies after falling from running local near kamshet railway station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवार, दिनांक 1 जून रोजी रोजी सकाळी 09.30 वाजताच्या सुमारास कामशेत ते मळवली दरम्यान वाडीवळे गेट नं. 42 जवळ रे. कि.मी. नं. 142/23 अप लाईनवर एक अनोळखी महिला (वय अंदाजे 60 वर्षे) ही धावत्या लोकलमधून पडून झालेल्या जखमांमूळे मृत पावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार सावंत हे करत आहे. सदर महिलेच्या डाव्या हाताला पट्टा असून कमरेला निळ्या रंगाचा पट्टा आहे. तिच्याबाबत कुणालाही काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन रेल्वे पोलिस सावंत यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– पावसाळ्यापूर्वी शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
– मळवंडी ठुले गावात खरीप हंगाम सभा; कृषि विभागाकडून भातपीक आणि योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन