Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी म्हणून अनिता मुरलीधर वैद्य यांची नुकतीच शिक्षण विभागामधून नियुक्ती करण्यात आली.
या आधी या पदावर असलेल्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांची मावळ तालुका गट शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिता वैद्य या सन २०१३ मध्ये शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव, वर्धा, सातारा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाल्या. तिथेच वर्ग २ अतिरिक्त कार्यभार गृहप्रमुख व कुलप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर विभाग बदलीने तळेगाव दाभाडे येथे प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी

