Dainik Maval News : मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघावर प्रशासकीय कामकाज करण्यासाठी अशासकीय प्रशासकीय समिती नेमण्यात आली असून, मुख्य प्रशासक म्हणून संघाचे माजी अध्यक्ष अंकुश रामचंद्र आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रशासक म्हणून अमोल बाबूराव केदारी व सुरे सोनू चोरघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळचे सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
मावळ खादी ग्रामोद्योग संघावर प्राधिकृत अधिकारी यांच्याऐवजी अशासकीय प्रशासकीय समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सहायक निबंधक कांदळकर यांनी या संस्थेवर प्रशासकीय कामकाज करण्यासाठी प्रमाणित लेखापरीक्षक बी. जे. पवार यांच्याऐवजी तीन जणांची प्रशासकीय समिती नेमली आहे. ही समिती संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहून, संस्थेच्या व्यवस्थापक समितीची निवडणूक घेऊन नवनिर्वाचित समितीकडे पदभार सुपूर्द करेल, असे या आदेशात म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे – नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुजा चोपडे यांची निवड । Kanhe News
– अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश