Dainik Maval News : बिनविरोध निवडणूक झालेल्या मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अंकुश आंबेकर यांची निवड झाली आहे.
मावळ तालुका कार्यकारी सहकारी ग्रामोदयोग संघ मर्या., वडगाव (ता. मावळ) ची सन 2024-25 ते 2029-30 या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यात अकरा जागांवर संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज, सोमवारी (दि. 28 एप्रिल) संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक होणार होती.
त्यानुसार सोमवारी, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या अध्यक्षपदी अंकुशराव आंबेकर यांची तर उपाध्यक्षपदी भरत गरुड यांची बिनविरोध निवड झाली. अंकुशराव आंबेकर यांची ग्रामोद्योग संघावर पाचव्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
अकरा संचालक यादी
1. साहेबराव तुळशीदास मोहिते ( खनिज आधारित उद्योग)
2. सुरेश धोंडीबा जाधव (वनावर आधारित उद्योग)
3. भरत गणपत गरूड (कृषी आधारित व खाद्य उद्योग)
4. अंकुश रामचंद्र आंबेकर (पॉलीमर व रसायन आधारित उद्योग)
5. छबुराव चिंधू गायकवाड (अभियांत्रिकी व अपारंपारिक उर्जा)
6. चंद्रकांत निवृत्ती दाभाडे (वस्त्रोद्योग व सेवा उद्योग)
7. भावना सुभाष ओव्हाळ (महिला प्रतिनिधी)
8. कल्पना अनिल भोर (महिला प्रतिनिधी)
9. अमित पांडुरंग ओव्हाळ (अनुसुचित जाती/जमाती)
10. संतोष दगडू कुंभार (इतर मागास वर्ग)
11. अन्वर इब्राहिम सिलीकर (भ.ज/विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC