पुणे ग्रामीण भागामधील 13 तालुक्यांमध्ये 241 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास 1 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ( appeal to apply for cheap grain shop license up to 1st September in pune district )
पुणे ग्रामीणमध्ये दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील एकूण 241 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा 1 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी 1 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी कळविले आहे.
स्वस्त धान्य दुकानाचा परवाना हा ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणी झालेले स्वयंसहायता बचत गट, सहकारी संस्था ज्या संस्थांची महाराष्ट्र सहकार कायदा 1960 अंतर्गत नोंदणी झालेली आहे. अशा संस्थांना स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळू शकतो. जर स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला असेल तर परवाना हा समितीकडे जेवढे अर्ज प्राप्त झाले असतील त्या अर्जाची सर्वप्रथम प्राथमिक पणे तपासणी केली जाते. तपासणी केल्यानंतर अर्जाचे छाननी केली जाते. त्यानंतर जागेची तपासणी देखील केली जाते. आणि इतर आवश्यक तपासणी देखील केल्या जातात नंतर पात्र लाभार्थ्यांना परवाना देण्यात येतो.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road
– राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; तळेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा