Dainik Maval News : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.
विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन 20 टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर 10 टक्के आर्थिक भार असणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता 20 ते 40 वयोगटातील 3 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. योजनेअंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘गांजा’ वाहतूक प्रकरणी तरुणाला रंगेहात अटक, कान्हे उपजिल्हा रुग्णालयासमोर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई । Vadgaon Maval
– लोणावळ्यात दोन किलो गांजा जप्त, महिलेसह 2 जणांवर गुन्हा दाखल । Lonavala Crime
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कुसगाव बुद्रुक येथे कारवाई ! अंमली पदार्थांसह 3 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त