पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य घेताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ( मोबाईल नंबर ) ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचा ठसा देवून अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे. भ्रमणध्वनी क्रमांक अद्यावत केल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळाले, याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले आहे. ( Appeal To Ration Card Holders To Update Mobile Number Through E-Pos Machine Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या रेशन कार्ड बाबतीत सरकारकडून अनेक उपाययोजन राबवल्या जात आहे. गरजू लोकांपर्यंतच धान्य पोहचावे, यासह शासनाकडून जितके धान्य दिले जात आहे तितके धान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचावे, यासह रेशन वितरणाची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहे. रेशन कार्डला मोबाईल क्रमांक जोडणे हा त्याचाच भाग आहे. यामुळे पावतीसह प्रत्येक शिधा पत्रिका धारकाला आता मेसेजद्वारे त्याला किती धान्य मिळाले, याची माहिती मिळणार आहे. यातूनच प्रक्रियेत अधिक पारदर्शकपणा येणार आहे.
अधिक वाचा –
– ‘जल जीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करा’; कळकराई ग्रामस्थांना आमदार शेळकेंनी दिला ‘हा’ शब्द
– एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा विदेशी मद्यसाठ्यासह 3 जण ताब्यात