व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अत्यंत महत्वाचे! पुणे-सोलापूर, पुणे- सातारा, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग हद्दीतील अनधिकृत व्यवसाय काढून घेण्याचे आवाहन

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 तसेच पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील अनधिकृत व्यवसाय सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 24, 2024
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
unauthorized-illegal-businesses-on-highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 तसेच पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील अनधिकृत व्यवसाय सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन करतानाच सेवा मार्गावरील दुभाजक तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिला आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील या तीनही महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या काही मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे एनएचएआयच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्गाच्या विस्तारीकरण कामास अडथळे येत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात 30 मी. कायदेशीर हक्काचा मार्ग (राईट ऑफ वे) आहे त्या भागात मध्यापासून 15 मीटर तसेच ज्या भागात 60 मी. राईट ऑफ वे (आरओडब्ल्यू) आहे त्या भागात मध्यापासून 30 मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात 30 मी. ‘आरओडब्ल्यू’ आहे त्या भागात मध्यापासून 15 मीटर, ज्या भागात 45 मी. आरओडब्ल्यू आहे त्या भागात मध्यापासून 22.5 मी. तर ज्या भागात 60 मी. राईट ऑफ वे आहे त्या भागात मध्यापासून 30 मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील मध्यापासून 30 मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. (Appeal to remove unauthorized businesses from Pune-Solapur Pune-Satara Pune-Nashik National Highways)

ही अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम 2002 अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जे व्यावसायिक महामार्गावरील व सेवा रस्त्यांवरील मार्ग दुभाजक अनधिकृतपणे तोडून येण्या-जाण्याकरीता मार्गिका तयार करतील अशा व्यावसायिकांवर व अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांचा व्यावसाय परवाना जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल. तरी सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी व अनधिकृतपणे मार्ग दुभाजक तोडू नये किंवा महामार्गावर तसेच सेवा रस्त्यांवर अतिक्रमण करु नये, असे आवाहन प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक
– मोठी बातमी! भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणेंकडून अडीच कोटी निधी देण्याचा संकल्प, एक कोटीचा धनादेश सुपूर्द
– सिडकोच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, वाढीव रक्कम होणार कमी, लवकरच मिळणार ताबा । Maval Lok Sabha News


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यातील जलरथाला हिरवा झेंडा; विविध योजनांची माहिती देण्यासाठी 13 तालुक्यातील 1 हजार 843 गावांतून फिरणार चित्ररथ

Next Post

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला ‘दुर्ग रत्न’ पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shivdurg-Mitra-Lonavla

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला 'दुर्ग रत्न' पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.