व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक

पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
eknath-shinde-shrirang-barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मुळशी धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित केले जाणार आहे. शहरासाठी दहा टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे झपाट्याने वाढणा-या वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, पिंपळेसौदागरसह नव्याने समाविष्ट होणा-या सात गावांचा पाणी प्रश्न सुटरणार आहे. आयटीनगरी हिंजवडीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. शहरातील पाण्याच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. शहराचा सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर,विकासाचा वेग आणि भविष्यातील सन 2041 पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेऊन मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आणावे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी सद्यस्थितीत पवना धरणातून 185.67 द.ल.घ.मी, आंद्रा धरणातून 36.87 द.ल.घ.मी. व भामा धरणातून 60.79 असा एकूण 283.33 द.ल.घ.मी. एवढा वार्षिक पाणीसाठा उपलब्ध आहे. (10 TMC water from Mulshi dam to Pimpri Chinchwad city said MP Shrirang Barane)

  • शहराचा सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग व भविष्यातील सन 2041 पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेता, शहरासाठी आणखी पाणी उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. यासाठी पुणे विभागात असणारे मूळशी धरणातून 10 टीएमसी पाणी आरक्षित करुन पिंपरी-चिंचवड शहरासाठी उपलब्ध करुन देणे शक्य आहे. याकामी सर्व संबंधित विभागांना सूचना द्याव्यात. पिंपरी-चिंचवड शहरासाठी 10 टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास शहराचा भविष्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.

मुळशी धरण 24 टीएमसीचे आहे. 10 टीएमसी पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला मिळावा. मुळशी धरणातून पाणी मिळाल्यास शहरात समाविष्ट होणा-या सात गावांचा तसेच झपाट्याने विस्तारात असलेल्या वाकड, ताथवडे, थेरगाव, पिंपळेनिलख या वाढत्या परिसराला मोठा पाणीसाठा उपलब्ध होईल. त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल. आयटी क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेसाठी दहा टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याबाबत संबंधित अधि-यांशी चर्चा करतो. त्यांना तशा सूचना दिल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– पुढील 30 वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; वाचा काय म्हणाले अजितदादा । Pune News
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचे लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात छापे; 1 लाखाचा गुटखा जप्त, 2 जण ताब्यात । Lonavala Crime News
– महत्वाची बातमी! मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल । Mumbai Pune Expressway News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणेंकडून अडीच कोटी निधी देण्याचा संकल्प, एक कोटीचा धनादेश सुपूर्द

Next Post

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
health-camp

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.