Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणुन प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
निवडणूक खर्च निरीक्षण प्रेमप्रकाश मीना यांनी बुधवारी (दि. २३) मावळ विधानसभा मतदारसंघ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक कक्षाची माहिती आणि विधानसभा निवडणूक कामकाजाविषयक कार्यपद्धती यांबाबत माहिती घेऊन त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. तसेच मतदारसंघातील त्यांच्या काही तक्रारी असल्यास निवारणाकरीता सी- व्हिजील अँप वर नोंद करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख, कुलदीप प्रधान, अशोक साबळे, निवडणूक खर्च कक्ष समन्वय अधिकारी अश्विनी मुसळे, निवडणूक खर्च नियंत्रण समन्वयक अर्चना शेवते, लेखाधिकारी गजानन शेरेकर, आचारसंहिता कक्ष समन्वयक कुलदीप प्रधान, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष व कायदा व सुव्यवस्था कक्ष गणेश तळेकर, मीडिया कक्ष समन्वयक रश्मी ओहोळ, एकखिडको कक्ष समन्वयक विशाल कोतागडे, अविनाश खैरे उपस्थित होते.
प्रेमप्रकाश मीना यांचा संपर्काचा पत्ता –
रुम नंबर – अ / १०३, ग्रीन बिल्डींग व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, क्वीन्स गार्डन – ४११००१
भेटण्याची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजे पर्यंत
भ्रमणध्वनी क्रमांक – ९०२१५१३४४५
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जोरदार शक्तीप्रदर्शनासह सुनिल शेळके यांचा मावळ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, जीवाभावाचे चार सहकारी होते उपस्थित
– महाविकासआघाडी भूमिका जाहीर करणार? स्वतंत्र उमेदवार देणार की बापूसाहेब भेगडेंना पाठींबा देणार? तालुक्यात वेगळीच चर्चा
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे