Dainik Maval News : पुणे परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत पीएमआरडीएच्या 3 हजार 838 कोटी 61 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
मुख्य पुणे शहर दाटीवाटीचे झाले आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा राहतील, याची काळजी घ्या. पुण्याच्या विकासाचे नियोजन करताना तज्ज्ञांची मदत घ्या. पुण्यात होणारे कन्व्हेन्शन सेंटर हे जागतिक दर्जाचे होण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
अधिक वाचा –
– खोपोलीतील झेनिथ धबधबा येथे वर्षा विहारासाठी गेलेल्या तरुणीचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू । Khopoli News
– पूररेषेत बांधकामे होत असताना डोळेझाक प्रशासनाने केली, त्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना का? – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad News
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke