Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दरवर्षी निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती लक्षात घेता पवना नदी सुधार प्रकल्पासाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
जिल्हा वार्षिक योजना पुणे विभागाच्या पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत गोरखे यांनी ही मागणी केली. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागातील पवनानदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी निधीअभावी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. ही बाब आमदार गोरखे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.
- गोरखे म्हणाले, की पावसाळ्यात पवनानदीलगतच्या परिसरात पूरजन्यस्थिती निर्माण होते. मामुर्डी, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी या भागांमध्ये ही परिस्थिती पाहण्यास मिळते. पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी येथील नागरिकांना पूरजन्यस्थिती निर्माण झाल्यानंतर तात्पुरते स्थलांतर करावे लागते. त्यामुळे विशेष बाब म्हणून पवना नदीसुधार योजनेसाठी केंद्रासह राज्य शासनाकडून विशेष निधी मिळावा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. पवना नदीसुधार प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या आहेत. त्यांनीदेखील तत्काळ सकारात्मक सहमती दर्शविली आहे. तसेच, राज्य शासन आणि पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू होईल, असे नमूद केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ