घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून बायकोने बडबड केल्याचा राग मनात धरून नवऱ्याने आत्म’हत्या केल्या धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात उघडकीस आला आहे. भांडणानंतर पती 9 दिवसांपासून घरातून निघून गेला होता, त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगेश शिवाजी पवार (वय 26, रा. ठाकरवस्ती, डेक्कन हिल्सजवळ वडगाव मावळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याचे वडील शिवाजी ज्ञानू पवार (वय 45) यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेशने ब्राह्मणवाडी येथील डोंगरावर एका झाडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तपासात हातावरील गोंदलेले आणि अंगावरील कपडे यावरून त्याची ओळख पटवली. ( Argument between husband and wife for selling chicken Husband committed suicide )
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 7 जून रोजी मंगेशने घरातील कोंबडी घरी कोणाला न सांगता विकली होती. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला बडबड केली. दोघांमध्ये वादावादी झाले. त्याचा राग मनात धरून मंगेश हा घरातून निघून गेला होता. दरम्यान तब्बल 9 दिवसांनी रविवारी (दि. 9 जून) ब्राह्मणवाडी येथील डोंगरावर एका झाडाला त्याचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत दिसले. स्थानिक गुराखी मुलांनी ते पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयताचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. परंतू अंगावरील कपड्यावरून आणि दंडावरील गोंदण यावरून मयताची ओळख पटली.
अधिक वाचा –
– शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne
– कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News
– शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुणी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री किंवा बोगस वाण विक्री करत असल्यास ‘इथे’ करा तक्रार