Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार असलेल्या आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांचा गावभेट संवाद दौरा सध्या सुरू असून त्यांच्या गाव भेट दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच त्यांनी खडकाळा गणातील कामशेत गावात गावभेट दौरा केला, याप्रसंगी कामशेत ग्रामस्थांनी सौ. वायकर यांचे अतिशय भव्य स्वरुपात स्वागत केले.
कामशेत येथील गाव भेट दौऱ्यात आशाताई वायकर यांनी गावातील सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी त्याचबरोबर तरुण-तरुणी, वडीलधारी मंडळी व माता- भगिनींशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. तसेच, कामशेतच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन सौ. वायकर यांनी ग्रामस्थांना केले.
बाजारभागातील नागरिकांशी साधला विशेष संवाद ;
कामशेत शहर हे तीस ते चाळीस गावांची बाजारपेठ असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी बांधव आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या इच्छुक अन् प्रभावी उमेदवार असलेल्या आशाताई वायकर यांनी त्यांच्या कामशेत गावभेट दौऱ्यात कामशेत बाजारपेठेतील व्यापारी आणि सामान्य नागरिक, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते वर्गाशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.
सौ. वायकर यांच्या संपूर्ण कामशेत गाव भेट दौऱ्यात, कामशेतवासीयांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद जनकल्याणासाठी काम करण्याची ऊर्जा देणारा ठरला. कामशेतच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्याचे सौ. वायकर यांनी सांगितले. बाबुराव (आप्पा) वायकर, भाजपा चे मान्यवर मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
