Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरूणावर प्राणघातक घल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री अंदाजे साडेनऊच्या सुमारास रामवाडी चावसर (ता. मावळ) येथे ही घटना घडली. यासंदर्भात महिला फिर्यादीने 19 जानेवारीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी श्वेता उर्फ सारीका सोमनाथ बालगुडे (वय 33, रा. डॉ. आंबेडकर कॉलनी, चिंचवड, पिंपरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीवर आरोपींनी किरकोळ वादाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी त्यांच्या पतीची मोटारसायकल अडवून त्यांना जबरदस्तीने खाली ओढून हाताच्या ठोशा-बुक्क्यांनी तसेच लाकडी दांडके व दगड यांनी जोरदार मारहाण केली.
सदर हल्ल्यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले आहेत. डोक्याला, छातीला, पाठीला, चेहऱ्याला आणि इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. तसेच हल्ल्यादरम्यान पतीचे मोटारसायकल तोडफोड करण्यात आली आहे.
तानाजी बबन दळवी (वय 27, रा. केवरे गाव, ता. मावळ), सर्वेश चंदालिया (रा. पवनानगर, ता. मावळ), जितेंद्र चंदालिया (रा. पवनानगर, ता. मावळ), रोहित अनिल घरदाळे (रा. पवनानगर, ता. मावळ), अक्षय मोहन गराडे (वय 34, रा. धामणगाव, ता. मावळ), विकास शेलार (रा. करंजगाव, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत. जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News