Dainik Maval News : मावळ तालुक्यातील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक अतिश बजरंग थोरात यांनी जागतिक विक्रमाची हॅटट्रीक साधली आहे. त्यांनी जगातील सर्वात लहान तिरंगा (१ मीली मीटर) जगातील सर्वात लहान गणपती (२ मीली मीटर) आणि डोळ्याला कापड पट्टी बांधून शाडू मातीपासून ८ इंच मूर्ती (९ मिनिटात ) बनवली आहे. त्यांच्या कलेची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अतिश थोरात हे मूळात चित्रकला शिक्षक आहेत. परंतु सन 2008 पासून त्यांचा शाडुमातीशी संबंध आला आणि मूर्तीकला त्यांनी अवगत केली. तेव्हापासून त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी तालुक्यातील १०,००० विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे मूर्तीच्या मागील बाजुस विविधप्रकारच्या बिया टाकायला सांगतात. कारण ज्या ठिकाणी मूर्ती विसर्जीत केली जाईल त्याच ठिकाणी एक झाड उगवेल.
- अतिश थोरात यांनी ही कला जोपासत जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. थोरात यांनी अनेक नेत्यांचे, समाजसेवकांचे शाडुमातीपासून पुतुळे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे अशा २१ व्यक्तींचे शाडू मातीपासून १ फुटाचे अर्धपुतळे बनविले आहेत.
त्यांच्या कलेमुळे आतापर्यंत त्यांना एकूण २९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाच्या वतीने प्रसिद्ध शिल्पकार डि.एस.खटावकर यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. अतिश थोरात यांची २०१७ साली “जगा आणि जगुद्या ” हे वाक्य एक लाख एक हजार एकशे आकरावेळा लिहून इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहे. ( Atish Thorat an art teacher from Maval taluka holds a world record )
अधिक वाचा –
– शिवसेनेच्या आमदार आणि भाजपाच्या खासदाराविरोधात मावळ तालुका काँग्रेसचे आंदोलन ; गुन्हे दाखल करून अटकेची मागणी
– केंद्राच्या ‘एक देश – एक निवडणूक’ निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– Maval Vidhan Sabha : सुनिल आण्णांनी कसलीये कंबर.. रवी आप्पा अन् बापू साहेबांनी बी लावलाय नंबर.. कोण असणार महायुतीचा मेंबर?