Dainik Maval News : लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी लोणावळा शहरातील रखडलेल्या विकासकामांवरून नाराज होत आज (सोमवार, दि.3) नगरपरिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.
- माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी लोणावळा शहरातील पर्यटनविषयक विकासकामे, रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व नगर परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जाधव यांना शांत करीत त्यांची समजूत घातली. त्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी तातडीने आढावा बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. या घटनेमुळे लोणावळा शहरातील नागरी समस्या आणि प्रशासनाची भूमिका यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ( attempt of self-immolation of former mayor In Lonavala prevented by police )