तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रविवारी (दि. 26 मे) रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. तळेगाव दाभाडे येथील मारूती मंदिराजवळील आठवडी बाजारात ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हंबीराव धर्मा सुकळे (वय 30 रा. भोसरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर, दुराई पंडियान वेंकटा सुब्बियाह तेवर (वय 37 रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ( Attempt to steal gold chain in weekly market of Talegaon Dabhade )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तळेगावचा आठवडी बाजार होता. त्यामुळे फिर्यादी यांची पत्नी, मुलगी आणि अन्य असे काहीजण खरेदीसाठी बाजारात गेले होते. बाजारात भाजी खरेदी करत असताना फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन सदर चोरट्याने जबरदस्तीने हिसका मारून चोरुन नेली.
हा प्रकार फिर्यादी यांच्या मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या इतर नागरिकांनी आरोपी हंबीराव सुकळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरट्यावर आयपीसी 392 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करत आहेत.
अधिक वाचा –
– जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या ‘त्या’ अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !
– मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…
– दहावीचा निकाल जाहीर ! पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा 100 टक्के निकाल, सिद्धी सुतारचा पहिला नंबर । Pavananagar News