Dainik Maval News : कामशेत हद्दतील इंद्रायणी नदीत उडी मारत ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान दाखवित वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी या व्यक्तीला पाण्याबाहेर काढले आणि त्याचा जीव वाचला आहे.
ही घटना कामशेत रेल्वे स्थानकाजवळ घडली. हा व्यक्ती मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील असून सध्या चाकण येथे वास्तव्यास असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत स्टेशन परिसरातून मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आला. पोलीस पाटील जाधव यांनी त्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक व्यक्ती नदीत बुडत असल्याचे दिसले. जाधव यांनी कामशेत पोलीस चौकीला घटनेची माहिती दिली. दरम्यान, वन्यजीव रक्षक मावळ पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.
वन्यजीव रक्षक शुभम आंद्रे, सचिन शेडगे व किशोर लष्कर यांनी अथक प्रयत्न करून या व्यक्तीला पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम