जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवार (6 ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. बोरघाटात सायमाळ जवळ रिक्षा आणि बस यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात रिक्षातील एक प्रवासी जागीच ठार झाला. तर रिक्षा ड्रायवरसह अन्य तीन जण जखमी झाले. यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. ( Auto Rickshaw and Bus Accident On Old Mumbai Pune Highway Near Khopoli Borghat Saimal )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कुमार गौरव गौतम (मुळ राहणार रीवा, मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव असून शत्रुंजय त्रिपाठी, राघवेंद्र सिंह राठोड, आणि सौरभ पाठक हे अन्य तीन प्रवासी जखमी झालेत. तर रिक्षा चालक किरण वाघमारे (रा. लोणावळा) यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जवळील खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुलसार, सर्व पॅसेंजर हे रेल्वे विभागामध्ये असिस्टंट लोको पायलट म्हणून नोकरीस असल्याचे दिसून येते. रेल्वे विभागाला देखील याबाबत माहिती देण्यात आली येत असून पुढील तपास सुरू आहे.
अधिक वाचा –
– आणिबाणीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना मिळणार मानधन, मावळ तालुक्यातील 19 जणांचा समावेश
– मोठी कारवाई! पुणे विभागात तब्बल 30 लाख 37 हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त