Dainik Maval News : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाअंतर्गत सभासद नोंदणीकरिता https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या मंडळाअंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांचा ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांच्या एका कुटुंबातील अधिकाधिक चार व्यक्ती लाभ घेता येणार आहे. त्यांच्याकडे अनुज्ञप्ती, बॅज, परवाना, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅनकार्डची आवश्यकता आहे.
अर्जदारांनी आपली नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीनेच करून शुल्क भरणा करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे कार्यकारी अधिकारी तथा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या