Dainik Maval News : स्टार प्रवाह या टीव्ही वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद’ या रियालिटी शो ने प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. या कार्यक्रमात मावळ तालुक्यातील बालगायिका कु. अवनी आशुतोष परांजपे हि देखील स्पर्धक आहे. तिने जुगलबंदी सादर करुन स्पर्धेचे सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळविला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गीत बागडे बरोबर “उगवला चंद्र पुनवेचा हे नाट्यगीत, डोल डोलते वाऱ्यावर हे कोळीगीत, तराणा, सरगम आणि पाश्चात्य फ्युजन असलेल्या या जुगलबंदीचे परीक्षक सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी जागेवर उभे राहून मानवंदना देऊन त्यांच्याजवळ जाऊन भरभरून कौतुक केले. ओपी परफॉर्मन्सचा पुष्पवर्षाव झाला. आवाज वाढव अशी प्रोत्साहन पर आरोळी मिळाली. सचिन पिळगावकर यांनी त्यांची स्पेशल शंभर रुपयाची नोट देऊन दोघींचे कौतुक केले. घंटा नादही केला. आणि जुगलबंदीतील दोन्ही कलाकार सेमी फायनल मध्ये पोहोचले आहेत, असा निर्णय दिला. ( Avni Paranjpe from Maval taluka in reality show of Star Pravah TV channel Mi Honar Super Star )
अवनी परांजपे ही तळेगावातील कलापिनीच्या वातावरणात घडलेली बालकलाकार अंजली कराडकर यांच्याकडून गायन कीर्तन, नाट्यभिनय यांचे शिक्षण घेत आहे. कलापिनीचे बालनाट्य शिबिर, दिवाळी पहाट अशा कार्यक्रमात अवनीचा सहभाग असतो. कलापिनी आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा, बालकथा नाट्य स्पर्धा, यात अवनीने प्रथम पारितोषिके मिळवली आहेत.
अवनी व अंजली कराडकर यांची बेल्जियम आणि नेदरलँड्स या ठिकाणी कीर्तने झाली आहेत. अवनी कथक नृत्याचेही शिक्षण घेत आहे, भारतीय विद्या भवन च्या सुलोचना नातू विद्या मंदिरात इयत्ता नववी मध्ये ती शिकत आहे. आपले गायन कौशल्य, गुणवत्ता, आणि रसिकांचे पाठबळ आशीर्वाद यामुळे तळे गावचे व मावळचे नाव गाजवेल असा विश्वास वाटतो.
अधिक वाचा –
– सोमाटणे फाटा येथे शिवसेना उबाठा पक्षाकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध । Maval News
– ‘होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन’कडून आंदर मावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाचे धडे । Maval News
– मोठी बातमी ! पवनमावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 99 टक्के भरले, 1400 क्युसेक विसर्ग सुरू