रोटरी क्लब ऑफ मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी सणाचे औचित्य साधून सोमवारी, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सर्पांविषयी जनजागृती व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मावळ आणि देशभरातील विविध सर्पांच्या प्रजातीं विषयी स्लाईडच्या माध्यमातून विषारी, निमविषारी, बिनविषारी सर्पांविषयी माहिती देण्यात आली. ( Awareness lectures about snakes through Rotary Club and Wildlife Protector Maval Sanstha )
तसेच सापांचे भक्ष्य, सर्पदंश उपाय आणि खबरदारी, सर्पदंशावर लसीकरण, सर्पांविषयीच्या अंधश्रद्धा, सर्प अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तळेगाव दाभाडे येथील अण्णासाहेब चौबे (बाल विकास) हायस्कूल आणि कामशेत येथील महर्षी कर्वे निवासी आश्रम शाळेतील सुमारे 900 विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ घेता आला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद जिगर सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.
याप्रसंगी दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. गौरव बरहोदिया विशेष उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रो. सुनील पवार, सेक्रेटरी रो. रेश्मा फडतरे, प्रकल्प प्रमुख रो. रूपेश चव्हाण, रो. पूनम देसाई, रो. विशाल चव्हाण, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक रो. निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, किरण मोकाशी, जिगर सोलंकी, भास्कर माळी, गणेश गायकवाड, अनिश गराडे, विकी दौंडकर यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यक्रम अतिशय उत्तम रित्या पार पडला.
अण्णासाहेब चौबे (बाल विकास) हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे आणि महर्षी कर्वे निवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे यांनी दोन्ही संस्थेच्या सभासदांचे आभार मानले. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले. ( Awareness lectures about snakes through Rotary Club and Wildlife Protector Maval Sanstha )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती
– वडगाव शहरात ‘ना नफा – ना तोटा’ तत्वावर वॉटर एटीएमची सुरुवात; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– मावळ भाजपचा 24 आणि 25 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा; रविंद्र भेगडे यांची माहिती
– पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा आरोपी 3 तासात गजाआड; लोणावळा ग्रामीण पोलिसांची ‘लई भारी’ कामगिरी