व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“सर्पदंश झाल्यावर दवाखान्यात जा, भक्ताकडे नाही”, कामशेत आणि तळेगावात सर्पांविषयी जनजागृती व्याख्यान

नागपंचमी सणाचे औचित्य साधून सोमवारी, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सर्पांविषयी जनजागृती व्याख्यान आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 22, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Awareness-lectures-about-snakes

Photo Courtesy : Nilesh Garade


रोटरी क्लब ऑफ मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी सणाचे औचित्य साधून सोमवारी, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सर्पांविषयी जनजागृती व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मावळ आणि देशभरातील विविध सर्पांच्या प्रजातीं विषयी स्लाईडच्या माध्यमातून विषारी, निमविषारी, बिनविषारी सर्पांविषयी माहिती देण्यात आली. ( Awareness lectures about snakes through Rotary Club and Wildlife Protector Maval Sanstha )

तसेच सापांचे भक्ष्य, सर्पदंश उपाय आणि खबरदारी, सर्पदंशावर लसीकरण, सर्पांविषयीच्या अंधश्रद्धा, सर्प अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तळेगाव दाभाडे येथील अण्णासाहेब चौबे (बाल विकास) हायस्कूल आणि कामशेत येथील महर्षी कर्वे निवासी आश्रम शाळेतील सुमारे 900 विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ घेता आला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद जिगर सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.

याप्रसंगी दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. गौरव बरहोदिया विशेष उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रो. सुनील पवार, सेक्रेटरी रो. रेश्मा फडतरे, प्रकल्प प्रमुख रो. रूपेश चव्हाण, रो. पूनम देसाई, रो. विशाल चव्हाण, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक रो. निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, किरण मोकाशी, जिगर सोलंकी, भास्कर माळी, गणेश गायकवाड, अनिश गराडे, विकी दौंडकर यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यक्रम अतिशय उत्तम रित्या पार पडला.

अण्णासाहेब चौबे (बाल विकास) हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे आणि महर्षी कर्वे निवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे यांनी दोन्ही संस्थेच्या सभासदांचे आभार मानले. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले. ( Awareness lectures about snakes through Rotary Club and Wildlife Protector Maval Sanstha )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती
– वडगाव शहरात ‘ना नफा – ना तोटा’ तत्वावर वॉटर एटीएमची सुरुवात; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– मावळ भाजपचा 24 आणि 25 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा; रविंद्र भेगडे यांची माहिती
– पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा आरोपी 3 तासात गजाआड; लोणावळा ग्रामीण पोलिसांची ‘लई भारी’ कामगिरी


Previous Post

हिंजवडी, माण, मारूंजीसह ‘या’ 7 गावांचा लवकरच महापालिकेत समावेश होणार, खासदार बारणेंची माहिती; मुख्यमंत्र्यांचेही आश्वासन

Next Post

सुदवडी गावातील साई-सृष्टी नगरात अंतर्गत रस्त्याची दुर्दशा, स्थानिकांनी स्वखर्चाने केली तात्पुरती सुधारणा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sudavadi-Village-Maval

सुदवडी गावातील साई-सृष्टी नगरात अंतर्गत रस्त्याची दुर्दशा, स्थानिकांनी स्वखर्चाने केली तात्पुरती सुधारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.