मावळ तालुक्यातील राजकारण हे सध्या शेळके-भेगडे आणि बारणे या तीन नेत्यांमुळे राष्ट्रवादी-भाजपा आणि शिवसेना या पक्षांभोवती फिरत आहे. 2019 पर्यंत तालुक्यात फक्त भाजपा-शिवसेना यांचाच दबदबा होता असे दिसून यायचे. मात्र, आमदार शेळके हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर तालुक्यातील सर्व गणित बदलले. तालुक्यातील अनेक संस्था, संघटना यांच्यावर राष्ट्रवादीची मदार दिसू लागली. परंतू, यंदा राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पुन्हा एकदा मावळ मतदारसंघातही राजकीय गणिते नव्याने जुळून संस्था-संघटना यांच्यात सत्ताबदल होताना दिसत आहे. ( Balasaheb Dhore Of BJP Elected As Chairman Of Maval Taluka Buying and Selling Federation )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आधी खादी ग्रामोद्योग संघ भाजपा महायुतीने ताब्यात घेतला. त्यानंतर आता मावळ तालुका खरेदी विक्री संघावर देखील भारतीय जनता पक्षाने झेंडा रोवला आहे. मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब ढोरे आणि व्हाईस चेअरमनपदी नितीन साळवे यांची बहुमताने निवड झाली आहे.
तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, मा उपसभापती शांताराम कदम, किरण राक्षे, दत्ता केदारी, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, रामदास आलम आदींनी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी महायुतीच्या कांचन भालेराव, राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग
– मावळ भाजपाचे नूतन कार्यालय तालुक्यात विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे ठरेल – माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे