शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज ( दिनांक 23 जानेवारी) रोजी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यातील पवनानगर – काले येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आणि काले-पवनानगर ग्रामपंचायतीकडून बाळासाहेबांची आणि नेताजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जयंती दिनी ग्रामपंचायत कार्यालय, पवनानगर शाळा, सरकारी रुग्णालय आणि बाजारपेठ येथे बाळासाहेबांच्या आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. तसेच लहानग्या विद्यार्थ्यांना बाळासाहेब आणि नेताजीच्या कार्याची माहिती सांगून त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच, सरकारी रुग्णालयात रुग्णाना फळांचे वाटप करण्यात आले. ( Balasaheb Thackeray Netaji Subhash Chandra Bose Birth Anniversary Celebrated By Shiv Sena Thackeray Group At Pavananagar Maval Taluka )
यावेळी शिवसेना (ठाकरे गट) उपतालुका प्रमुख अमित कुंभार, युवासैनिक विकास कालेकर, शाखाप्रमुख किशोर शिर्के, युवानेते शक्ती जव्हेरी, वाहतुक सेना अध्यक्ष संतोष कालेकर, शिवसैनिक विलास वरघडे, शंकर दिवाडकर, अजित कुंभार, निखिल गुप्ता, प्रविण वैष्णव, तेजस गांधी, अमोल कालेकर, संजय दिवाडकर, अल्ताफ शेख, राहुल जव्हेरी, अतुल केंडे, खंडु कालेकर, सागर कालेकर, शशिकांत कालेकर आदी पदाधिकारी आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा
– कामशेतमध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणी शिबिर संपन्न; सुनिल तटकरे, हरी नरके आदी मान्यवरांनी केले मार्गदर्शन