Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विकू नयेत, तसेच नगरपरिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणीच परवानगी घेवून फटाक्यांची विक्री करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. याबाबतचे परिपत्रक तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी प्रसिद्ध केले आहे.
शहरातील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक आणि फटाके वापर करणारे नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार 125 डीबी (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री वापर करण्यास मनाई केली आहे. आणि अशा फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉफ्ट लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी, यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत. यासह जनहित याचिका क्रमांक १५२/२०१५ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम १८८४ आणि त्यास अंतर्गत केलेले विस्फोटक नियम २००८ मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नयेत. तसेच फटाक्यांची विक्री नगरपरिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेवूनच करण्यात यावी, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हजारोंची गर्दी… दमदार एन्ट्री… बापूसाहेब भेगडे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ! चार पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha
– उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर