लोकसभा निवडणूकीच्या एकूण 7 टप्प्यांपैकी तीन टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. 4 टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व जागांचे निकाल हे 4 जून रोजीच्या मतमोजणीनंतर जाहीर होतील. मावळ लोकसभेत दिनांक 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले, आणि आता सर्व मतदारांना 4 जून रोजी काय निकाल लागणार, याकडे लक्ष लागलेले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभेत यंदा कडवी लढत पाहायला मिळाली. शिवसेना पक्षातील फुटीनंतरचे दोन्ही गट मावळ लोकसभेत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून तथा महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तथा महाविकासआघाडीच्या वतीने संजोग वाघेरे पाटील हे रिंगणात होते. दोन्ही उमेदवारांनी तोडीसतोड तोड प्रचार मतदारसंघात केला होता. त्यामुळे अंतिमतः निकाल काय लागेल, याबद्दल उत्सूकता वाढली आहे.
मात्र निकाल जरी 4 जून रोजी असला तरीही निकालाआधीच मावळ लोकसभेत एका उमेदवाराचे विजयाचे बॅनर झळकले आहेत. महाविकासआघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात जागोजागी संजोग वाघेरे यांच्या विजयाचे आणि त्यांना खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले आहेत.
मावळ विधानसभा क्षेत्रातील देहूगाव, माळीनगर परिसरात संजोग वाघेरे यांच्या समर्थकांनी ‘खासदार’ असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. ‘खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित.. घासून नाही ठासून हाणली… संजोग वाघेरे यांचे प्रचंड बहुमतांनी खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..’ असे मजकूर असलेले बॅनर लावण्यात आलेत.
काही दिवसांपूर्वी खुद्द संजोग वाघेरे यांनीही पाऊणेदोन लाखाच्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता ह्या बॅनरबाजीमुळे महायुतीच्या गोटात वातावरण जरा चिंतेचे बनले आहे. ( Banners of Sanjog Waghere victory have been put up in Maval Lok Sabha constituency )
अधिक वाचा –
– 9890099009 – मावळवासियांनो हा नंबर सेव्ह करा ! तुमच्या इथे पाण्याची समस्या असेल तर थेट आमदार सुनिल शेळकेंना करा फोन
– नागरिकांनो घराबाहेर बिलकूल पडू नका ! वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह कोसळतोय अवकाळी पाऊस । Maval News
– डेंग्यूला स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर हटविण्यासाठी ‘या’ उपाययोजना करा – आरोग्य विभागाचे आवाहन