मावळ तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या येळसे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बायडाबाई ज्ञानेश्वर कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या सरपंच सीमा मुंकुद ठाकर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर मंडल अधिकारी शिवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी सात सदस्यांपैकी पाच सदस्य उपस्थितीत होते, तर दोन सदस्य गैरहजर होते. ( Baydabai Kalekar Elected as Sarpanch of Yelse Gram Panchayat in Maval Taluka )
निवडणूक प्रक्रियेच्या चौकटीत राहून बायडाबाई ज्ञानेश्वर कालेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने दुपारी दोन नंतर निवडणूक अधिकारी एम.एम.चोरमले यांनी कालेकर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी निवडणूक अधिकारी शिवणे मंडल अधिकारी एम.एम.चोरमले, तलाठी सचिन जाधव, ग्रामसेवक एम.के.चांदगुडे, रामदास कदम यांनी काम पाहिले.
ग्रामपंचायत सदस्या आणि मावळत्या सरपंच सिमा ठाकर, विमल कालेकर, अक्षय कालेकर, सचिन सुतार यांच्या सह माजी सरपंच विजय ठाकर, पांडुरंग कडू,राष्ट्रवादी माजी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा ठाकर, गोंविद ठाकर, सुभाष कडू, अमित ठाकर, भाऊ ठाकर, तुकाराम कालेकर, अमित कालेकर, मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन ठाकर, पांडुरंग घरदाळे, अंकुश गायकवाड, काले सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊ कालेकर, दिलीप कालेकर, संतोष शेडगे, गणेश सातकर, माजी उपसरपंच निलेश काजळे, संभाजी काजळे, राहुल मोहोळ, निखिल कालेकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी गुलालाची उधळण करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
पवनाधरणासाठी संपादित केलेल्या जागेवर शेवती गाव होते. सन 1972 मध्ये शेवती गावाचे पुनवर्सन येळसे गावातील गायरान मधील काही जागेवर करण्यात आले होते. पंरतु आजपर्यंत शेवती वसाहतला सरपंच पदाचा मान मिळाला नव्हता. पंरतू बायडाबाई कालेकर यांच्या रुपाने शेवती वसाहत ला सरपंच पद मिळाले असल्याने शेवती वसाहत पुनवर्सन गावाला सरपंच पद मिळाल्याने ग्रामस्थांनी आंनदात जल्लोष साजरा केला. ( Baydabai Kalekar Elected as Sarpanch of Yelse Gram Panchayat in Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून मनोरुग्णाचा धुडगूस – व्हिडिओ
– आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ‘या’ मागण्यांचे निवेदन सादर
– ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक