Dainik Maval News : मुलीला घेऊन जा म्हटल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ११) पहाटे एक वाजताच्या सुमारास शिरगाव येथील अभिमान सोसायटी मध्ये घडली. मनोज बबन पवार (रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी पतीला मुलीला सोबत घेऊन जाण्यास सांगितले होते. त्या रागातून मनोज पवार याने पत्नीला शिवीगाळ करून हाताने व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. ‘तू जर आमची कुठे तक्रार केली तर तुला पाहून घेतो’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime
– मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News
– जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव