व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘महावितरण अभय योजने’त होणार 40 हजार प्रकरणांची तडजोड ; वीज चोरी आणि थकबाकीच्या प्रकरणांचा समावेश

‘महावितरण अभय योजना- 2024’अंतर्गत दाखलपूर्व 40 हजारांहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 14, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Mahavitaran Abhay Yojana - Pune District Lok Adalat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात शनिवारी (दि. १४) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीज चोरीच्या १२२ तर ‘महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत दाखलपूर्व ४० हजारांहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.

पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणामार्फत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीज चोरी आणि थकबाकीची प्रकरणे पुणे शहर आणि जिल्ह्यातून दाखल प्रकरणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहकांना तडजोडीच्या माध्यमातून विविध सवलती मिळणार आहेत. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण आणि जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांनी केले आहे.

या योजनांमध्ये प्रामुख्याने वीज कायदा कलम १३५ आणि १३८ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा समावेश आहे. वीज चोरी प्रकरणात कोर्टात दोषरोपपत्र दाखल नसेल, तर लोकअदालतीमध्ये ग्राहक दाखलपूर्व प्रकरणात तडजोड करू शकतात. वीज चोरी प्रकरणात लोकअदालतीमध्ये तडजोड केल्यास ग्राहकाला वीज बिलात १० ते १५ टक्के सवलत मिळू शकते.

जास्तीत जास्त ग्राहकांनी लोकअदालतीद्वारे वीज चोरीत फौजदारी आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणात तडजोड करून मुक्त व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा न्यायाधीश वडगाव मावळ डी. के. अनभुले, सचिव सोनल पाटील आणि महावितरण यांनी केले आहे.

महावितरण अभय योजनेबद्दल
महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत बिलाची संपूर्ण थकबाकी भरल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ केला जातो. तसेच ग्राहकास थकबाकी एकरकमी भरण्याचा किंवा ३० टक्के डाऊन पेमेंटसह जास्तीत जास्त सहा हप्त्यांत भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय उच्चदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास ५ टक्के, तर लघुदाब ग्राहकास १० टक्के अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. यानंतर ग्राहकास आहे त्याचा जागेवर किंवा अन्यत्र पुन्हा वीजजोडणी दिली जाईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime
– मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News
– जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव


dainik maval jahirat

Previous Post

‘मुलीला घेऊन जा’ म्हटल्याने पत्नीला बेदम मारहाण, शिरगाव येथील प्रकार । Maval Crime

Next Post

वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 108 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free health checkup camp for senior citizens of varu and Bramhanoli villages maval

वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 108 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.