Dainik Maval News : घराचे बांधकाम करण्यावरून झालेल्या भांडणात पाच जणांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.20 डिसेंबर) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील चांदखेड येथे घडली. समीर नेमचंद गायकवाड (वय 36) यांनी शुक्रवारी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी गणेश पांडुरंग गायकवाड (वय ३२), जितेंद्र कोडीबा गायकवाड, महेश कोडींबा गायकवाड (वय ४०), उमेश नारायण गायकवाड (वय ३८, सर्व रा. चांदखेड ता मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी जेसीबी मशिन आणले होते. फिर्यादींसोबत त्यांचा भाउ योगेश रामचंद्र गायकवाड, तेजस रामचंद्र गायकवाड, ॠषीकेश सदाशिव गायकवाड व फिर्यादीचे आत्ते भाउ गोंविद दिगंबर गोरडे सोबत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादींचे जेसीबी मशिन थांबविले.
आरोपी गणेश गायकवाड याने फिर्यादी समीर यांस लाकडी दांडक्याने मानेवर, डोक्यावर, पाठीवर मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे चुलत भाउ योगेश व तेजस यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News