Dainik Maval News : काले – पवनानगर येथील पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या सामाजिक सभागृहाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (दि. 30 सप्टेंबर) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सभागृहासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नांतून 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून होणाऱ्या इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली त्यानंतर या कामाचा भूमिपूजन समारंभ सोमवारी पार पडला.
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन 2024 – 2025 योजने अंतर्गत मौजे काले – पवना नगर येथे पवना कृषक सेवा संस्थे समोरील मोकळ्या जागेत सभागृह बांधणे या कामासाठी 15 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार सोमवारी हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन बाळासाहेब गोविंद दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, संस्थेचे माजी चेअरमन विश्वनाथ शेडगे, बाळासाहेब धामणकर, सुदाम काळे, आनंदा तुपे, चिंधू कालेकर, संजय मोहोळ, बबन ठुले, संदीप दळवी, सुर्यकांत दळवी, धोंडू कालेकर, बाळासाहेब कालेकर, अशोक जगदाळे, रामदास कदम, जगदीश छाजेड, किसन दळवी, मारूती दळवी, निवत्ती काळे, सुभाष साठे, सचिव सुरेश कालेकर, सहसचिव विजय भालेराव उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास राज्य सरकारची मान्यता ; 4 हजार 860 पदे विशेष शिक्षकांसाठी राखून ठेवणार
– सोनार समाजासाठी ‘संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
– कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, अनुकंपा धोरणही लागू ; राज्य सरकारचा मोठा निर्णय