Dainik Maval News : ‘या भागासाठी आजपर्यंत विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. आज भूमिपूजन झालेली कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच सुरु होतील,’ असे आमदार सुनील शेळके म्हणाले. ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन (दि.14) संपन्न झाले. यावेळी आमदार शेळके बोलत होते.
पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले की, ‘या भागातील मायबाप जनतेने मला नेहमीच मनापासुन साथ दिली आहे. आपल्या प्रेमाने, विश्वासाने आणि पाठिंब्यानेच मला प्रत्येक आव्हानांचा सामना करायला बळ मिळालं. तुमची साथ,तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. माझं प्रत्येक काम हे तुमच्या हितासाठीच असेल.’
भुमिपुजन समारंभास आमदार शेळके समवेत जेष्ठ नेते रामनाथ घोजगे, बाबासाहेब घोजगे, भरत घोजगे, खंडू पवार, समीर जाधव, रुपेश घोजगे, नारायणराव ठाकर, संपत दाभाडे, सरपंच माधुरी जाधव, प्रदीप बनसोडे, विक्रम कलावडे, नारायण शिंदे, सागर शिंदे, किसन शिंदे, जितेंद्र घोजगे, निलेश घोजगे, सय्यद जहांगीर, संतोष घोजगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटननगरी लोणावळा येथेही थांबणार
– मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण
– प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Actor Atul Parchure Died