Dainik Maval News : पवना कृषक सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या एका उमेदवाराचे बुधवारी (दि.12) अचानक निधन झाले. यामुळे रविवार, दिनांक 23 फेब्रुवारी रोजी होणारी पवना कृषक सहकारी संस्थेची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रमेश माळवदकर (रा. शिवणे) असे मृत्यू पावलेल्या उमेदवाराचे नाव असून ते पवना कृषकसाठी सर्वसाधारण गटातून उमेदवार होते. दरम्यान, मयत झालेल्या उमेदवाराची अधिकृत माहिती म्हणजे मयताचा दाखला अद्याप सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे आलेला नसल्याने ही निवडणूक होणार की रद्द होणार की पुढे ढकलली जाणार किंवा काय ? याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिलेली नाही.
परंतु, निवडणूक प्रक्रियेतील एखाद्या उमेदवाराचे अचानक निधन झाल्यामुळे सहकार कायद्याचे कलम ३१ चे अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया पुढे जाण्याची टाट शक्यता आहे. पवना कृषक सहकारी संस्थेच्या 13 जागांसाठी सध्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ