व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 15, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्याचे परिरक्षक भूमापक विनायक वाघचौरे तडकाफडकी निलंबित । Lonavala News

कामामधील अनियमता आणि अक्षम्य विलंबाप्रकरणी लोणावळा येथील परिरक्षक भूमापक विनायक वाघचौरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 7, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
suspended

file image


Dainik Maval News : कामामधील अनियमता आणि अक्षम्य विलंबाप्रकरणी लोणावळा येथील परिरक्षक भूमापक विनायक वाघचौरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच वडगाव मावळच्या उपअधिक्षक पल्लवी पाटील पिंगळे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहे.

जमाबंदी आयुक्त कार्यालयाने मंगळवारी (दि.4) हे आदेश जारी केले आहेत. वाघचौरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्याने जमाबंदी कार्यालयाने त्यांच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. वाघचौरे यांच्या बरोबरच राज्यातील अनेक कार्यालयांची दप्तर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दिरंगाई आणि अनियमितता आढळून आल्याने वाघचौरे यांच्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील नागोठणे येथील परिरक्षण भूमापक राहुल भोसले यांनाही निलंबित करण्यात आले असल्याचे येथील भूमि अभिलेख उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी सांगितले.

  • सिटी सर्व्हे अंतर्गत जमिनीची मोजणी, वारस नोंद, मालमत्तांच्या व जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंद इत्यादींसाठी सिटी सर्व्हे कार्यालयाकडे नागरिकांचे अर्ज येत असतात. नियमानुसार 25 दिवसांत ते निकाली काढणे वा त्यानुसार नोंदी करून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याची माहिती पाठविणे अपेक्षित असते. तथापि, वाघचौरे यांच्याकडील अनेक प्रकरणात वर्ष उलटून गेले तरी काहीच कार्यवाही होत नाही, अशा तक्रारी होत्या.

विलंबामुळे लाचखोरीचेही आरोप होत होते. या तक्रारी लक्षात घेऊन जमाबंदी आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन अधीक्षकांमार्फत वाघचौरे यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या कार्यालयातील अनेक अर्ज 250 दिवस, 300 दिवस, काही तर 400 दिवसांपासून थकीत असल्याचे आढळून आले. तर काही अर्जाबाबत फाईल आढळत नसल्याचे शेरे दिल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारांमुळे खात्याची प्रतिभा मलिन होत असल्याने संबंधित अधिकार्‍याच्या निलंबनाची कारवाई आवश्यक ठरते, असेही गोळे यांनी स्पष्ट केले.

परिरक्षण भूमाकक वाघचौरे यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपअधिक्षकाची असते. या तपासणीत त्याकडे पल्लवी पाटील- पिंगळे यांचेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे गोळे यांनी सांगितले.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर


dainik maval ads may 2025

Previous Post

रास्त भाव दुकान परवाना मिळविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर

Next Post

प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Dwarkanath Sanzgiri

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Dwarkanath Sanzgiri

प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Dwarkanath Sanzgiri

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

June 15, 2025
Brilliant performance of school in Pimpalkhute village Maval at district level Honored by Ajit Pawar

कौतुकास्पद ! मावळमधील पिंपळखुटे गावातील शाळेची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी ; अजित पवारांच्या हस्ते सन्मान

June 15, 2025
Maval Taluka NCP Meeting concluded at Vadgaon Mahayuti Rally on Saturday

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वडगावमध्ये सोमवारी महत्वपूर्ण बैठक ; आमदार शेळकेंसह सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित

June 15, 2025
Ashadhi Wari 2025 Manik and Raja will pull Palki Rath of Saint Tukaram Maharaj

आषाढी वारी 2025 : माणिक आणि राजा ओढणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ; आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण

June 15, 2025
maharashtra-police

मोठी बातमी : लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; ‘या’ नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

June 15, 2025
welcoming-students

सोमवारपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ; ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.