Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मावळ तालुक्यातील औंढे गावाजवळील पुलानजिक शिवशाही बसचा अपघाता झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने अपघात झाला असून बस कंट्रोल करण्यात चालकाला यश आले आहे, परंतु बस मार्गावर आडवी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज, शुक्रवारी (दि. 23 मे) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बसचा टायर फुटल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी शिवशाही बस विरुद्ध लेनवर अर्थात पुणे मार्गिकेवर डोंगराच्या कड्याला जाऊन आदळली. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. परंतु यामुळे पुणे दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News