तळेगाव दाभाडे शहरात अलीकडे लहान मोठ्या गुन्ह्यांच्या घटनात, त्यातही चोरीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे.
दिनांक 18 मार्च रोजी रात्री साडेदहा ते दिनांक 19 मार्च रोजी पहाटे पाचच्या दरम्यान तळेगाव दाभाडे शहरातील शेलारवाडी भागात एका राहत्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी आकाश राजेंद्र शिंदे (वय 16, रा. पोपट शेलार यांच्या खोलीत, शेलारवाडी, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ( bike parked in front of house in Talegaon Dabhade was stolen case registred against unknown thief )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुदे तारीख आणि वेळेत फिर्यादी यांची 40 हजार किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी गाडी (क्रमांक एम.एच. 14 एच सर 5146) ही कुण्या अज्ञात चोरट्याने राहत्या घरासमोर पार्क आणि लॉक करून ठेवलेली असतानाही चोरून नेली. सपोनि पाटिल हे या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– देशी बनावटीचे पिस्तूल आणि किलोभर गांजा सह दोन तरूणांना मावळ तालुक्यातील पुसाणे येथून अटक
– कार्ला फाटा जवळ भीषण अपघात; मनसे पदाधिकाऱ्यांकडून अपघातास कारण ठरलेल्या गाडी चालकाला जागेवरच ‘प्रसाद’