रविवारी (दिनांक 19 मार्च) पुन्हा एकदा कार्ला फाटा ते वेहेरगाव ( एकविरा देवी ) रस्त्यावर भीषण अपघात झाला. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्याच भरधाव पिकअप टेम्पोने व्हॅनने दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या भाविकांच्या एका स्विफ्ट कारला आणि सदापूर येथील अंकुश घारे या तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दुचाकी चालक आणि चारमधील महिला गंभीर जखमी झाली आहे. ( Pickup tempo and car accident on Karla Phata to Vehergaon road )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खरेतर यापूर्वी झालेले अपघात पाहता रविवारी काम बंद ठेवण्याचे सांगितले असताना, तसे ठरवले असतानाही रविवारी काम सुरु ठेवण्यात आले, त्यात अपघातास कारण ठरलेला पिकअप टेम्पोचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्याला जागेवरच प्रसाद दिल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अशोक वसंत कुटे यांनी दैनिक मावळला सांगितले.
तसेच, सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे असून याबाबत वारंवार अधिकाऱ्यांना दाखवून दिले असतानाही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही कुटे यांनी केलाय. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून ठेकेदार आणि अधिकारी सहभागी आहेत आणि या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवर, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, यासाठी उद्या (सोमवार, 20 मार्च) रस्त्याचे काम बंद पाडणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– भीषण अपघात! भरधाव बस अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली; 17 ठार, 30 गंभीर जखमी
– बिल्डर्स सुविधा देत नाही, तरीही पीएमआरडीएकडून सदनिका पूर्णत्वाचा दाखला मिळतोच कसा? – आमदार शेळके