दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार करून तीन आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 29 एप्रिल) रोजी सायंकाळी वडगाव-तळेगाव फाटा रस्त्यावर घडली. एका शोरूम समोर सायंकाळी पाऊणे पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन भाऊ शेलार (वय 36 रा. नानोली तर्फे चाकण ता. मावळ, जि. पुणे) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रकरणी अज्ञात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळचे पोलिस निरिक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी हे तळेगाव फाटा या दिशेने जात असताना तीन अनोळखी आरोपी एका दुचाकीवरून जात असताना हातात तलवार फिरवत होते. यावेळी फिर्यादी नितीन शेलार यांनी त्यांच्याकडे पाहिले असता, पाहिल्याचा राग येऊन तिघातील एका आरोपीने शेलार यांच्या डोक्यात तलवारीने वार केला आणि फरार झाले. ( bike rider was stabbed with a sword near talegaon dabhade fata case registered at vadgaon maval police )
यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर जखम झाली. जखमीवर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष जाधव यांनी घटनास्थळी आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. या गन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष जाधव करत आहेत.
अधिक वाचा –
– वडगावात 1 मे रोजी पार पडणार 11 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; वधू-वरांना मिळणार कपडे, अलंकार, संसाराच्या वस्तू आणि बरंच काही
– पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलीये खास ‘दिग्विजय योद्धा पगडी’, काय आहे खासियत? वाचा
– श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य – पाहा सुंदर फोटो