व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावात 1 मे रोजी पार पडणार 11 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; वधू-वरांना मिळणार कपडे, अलंकार, संसाराच्या वस्तू आणि बरंच काही

वडगाव मावळ येथील स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा, हा येत्या बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी संपन्न होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
marriage

Photo Courtesy : File Image


Vadgaon Maval : वडगाव मावळ येथील स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा, हा येत्या बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी संपन्न होणार असून या विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे आणि सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष रोहिदास गराडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब तुमकर, कार्यक्रम प्रमुख अरुण वाघमारे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात बुधवारी पहाटे श्रींच्या अभिषेकाने या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. सकाळी 11 वाजता साखरपुडा, दुपारी 12 ते 3 पर्यंत भोजन समारंभ, दुपारी 1.30 वाजता हळदी समारंभ, दुपारी 3 ते 5 नवरदेवाची भव्य मिरवणूक व सायंकाळी 5.30 वाजता लग्न सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान या सोहळ्यानिमित्त सकाळी 9 ते 1 पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ( Community Marriage Ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan on 1st May 2024 at Vadgaon Maval )

याप्रसंगी हभप नितीन महाराज काकडे, मंगल महाराज जगताप, तुषार महाराज दळवी, दत्तात्रय महाराज टेमगिरे, सुदाम महाराज सानप, बाळासाहेब काशीद, माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, संजोग वाघेरे, बापूसाहेब भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत. लग्न समारंभ पूर्वी होणारी नवरदेवाची मिरवणूक या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे.

याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या हजारो वऱ्हाडी मंडळींना बसण्यासाठी भव्य मंडप तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारपयोगी भांडी, वधूला चांदीचे अलंकार, मनगटी घड्याळ देण्यात येणार असून लकी ड्रॉ ही ठेवण्यात आला आहे. या लकी ड्रॉ च्या माध्यमातून सर्व जोडप्यांना आकर्षक वस्तू भेट मिळणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी नंदकुमार ढोरे, योगेश वाघवले, संभाजी येळवंडे, अभिजीत ढोरे, अनिल कोद्रे, संतोष निघोजकर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी नियोजन करत आहेत.

अधिक वाचा –
– वडगाव शहरात महाविकासआघाडीने पेटवली संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची ‘मशाल’ । Vadgaon Maval
– “…आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील” – संजय राऊत । Maval Lok Sabha
– तळेगाव दाभाडे येथे 20 वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न । Talegaon Dabhade


Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलीये खास ‘दिग्विजय योद्धा पगडी’, काय आहे खासियत? वाचा

Next Post

अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण हुकले आणि चिमुकल्यासह 2 नाहक बळी गेले; टाकवे खुर्द हद्दीत महामार्गावर भीषण अपघात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
car accident on old Mumbai Pune highway

अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण हुकले आणि चिमुकल्यासह 2 नाहक बळी गेले; टाकवे खुर्द हद्दीत महामार्गावर भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.