शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पिंपरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 28 एप्रिल) करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाना साधला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह अन्य इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी दारून पराभव केला होता. आज 2024 मध्ये त्याच श्रीरंग बारणे यांचा अजित पवार यांना प्रचार करावा लागत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचार करत आहेत. यावरून शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. ( Ajit Pawar will defeat Shrirang Barne in Maval Lok Sabha constituency Said Sanjay Raut )
‘पार्थ पवारांचे वडील अजित पवार हे मावळमध्ये उतरले असले, तरी श्रीरंग बारणे यांचा पराभव अटळ आहे,’ असा टोला राऊतांनी अजित पवारांना लगावला आहे. तसेच, ‘बारामतीत नवरा म्हणून उतरणारे अजित पवार यांच्या पत्नीचा म्हणजे सुनेत्रा पवार यांचा पराभव होईल,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील. 2019 मध्ये पार्थ पवारसाठी वडील अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता बारामतीत नवरा म्हणून अजित पवारांना निवडणुकीत उतरावं लागत आहे. तरीही मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा आणि बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा –
– अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना तळेगाव-उर्से रस्त्यावर अटक; 2 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime
– लोणावळा जवळील शिलाटणे फाटा येथे भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार । Lonavala Accident
– वडगावात आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत मावळ राष्ट्रवादी बुथ कमिटी मेळावा संपन्न, पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश । Maval Taluka NCP