मावळ राष्ट्रवादी बुथ कमिटी मेळावा आज (दि. 28) वडगाव मावळ येथे संपन्न झाला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. सदर मेळाव्याला आमदार शेळकेंसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, बुथ कमिटी प्रमुख व राष्ट्रीय महिला काँग्रेस गाव अध्यक्षांसोबत संवाद साधला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“पक्ष बांधणीसाठी बूथ सशक्तिकरण महत्त्वाचे असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने गाव पातळीवर वैयक्तिक लक्ष देणे आवश्यक आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची बुथ यंत्रणा सक्षम असून सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कमिटी प्रमुख प्रत्येक गावात महायुतीच्या विजयासाठी नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत .त्यामुळे आपल्या तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराला निश्चितच आघाडी मिळेल,” असा विश्वास आमदार शेळकेंनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीला राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे प्रचार प्रमुख बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच पक्षातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maval NCP Booth Committee Meeting Concluded at Vadgaon In Presence of MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, सुरक्षेच्या दृष्टीने ‘या’ तीन दिवसांत पॅराग्लायडींग, ड्रोन उडवण्यावर बंदी । Pune News
– चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी धरले अजितदादांचे पाय, नेमकं काय घडलं? वाचा । Maval Lok Sabha
– कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद । Karla News