व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद । Karla News

कार्ला येथील देवी दुर्गापरमेश्वरी मंदिराच्या परिसरात सामुदायिक विवाहसोहळ्यात सर्वसाधारण कुटुंबातील 15 जोडपी विवाहबद्ध झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2024
in लोकल, ग्रामीण
Community Wedding Ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


कार्ला येथील देवी दुर्गापरमेश्वरी मंदिराच्या परिसरात सामुदायिक विवाहसोहळ्यात सर्वसाधारण कुटुंबातील 15 जोडपी विवाहबद्ध झाली. श्री एकविरा – जोगेश्वरी दुर्गापरमेश्वरी ट्रस्ट कार्ला यांच्या वतीने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात मावळातील दुर्गमभागातुन आलेल्या शकडो वऱ्हाडींच्या साक्षीने 15 जोडपी विवाहबद्ध झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सामुदायिक विवाहसोहळ्याची सुरूवात सकाळी साखरपुड्यांनी झाली. यावेळी माजी सभापती विठ्ठल शिंदे, राजाराम शिंदे, ज्ञानदेव शिंदे, नारायण ठाकर, गणेश धानिवले उपस्थित होते. हळदीचा कार्यक्रम नवरदेवांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात लग्न करणा-या प्रत्येक वधूस एकतोळा सोन्याचे मंगळसुत्र, कानातील कर्णफुले पायातील पैंजण, जोडवी, नथनी व कन्यादान म्हणून संसारउपयोगी वस्तू झाल, शिलाई मशिन दिली. साखरपुडा, हळदीच्या साड्या लग्नाला लागणारा वर राजास लग्नाचा सुट व वधूसाठी शालु 15 याचबरोबर प्रत्येक वरांना वधूना मनगठी घड्याळ तसेच संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. ( 15 couples tied the knot at Karla Community Wedding Ceremony )

यावेळी विवाह समारंभाला मावळचे आमदार सुनिल शेळके, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक विश्वजीत बारणे, मावळ भूषण ह भ प तुषार महाराज दळवी, गरुड झेप अॕकडमी प्रा डाॕ सुरेश सोनवणे, सरदार पाटील, प्रा विजय मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मावळ गणेश खांडगे, शरद पवार गट अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, शिव सेना नेते मच्छिंद्र खराडे, सरपंच दिपाली हुलावळे, जि. सदस्य बाबुराव वायकर, मावळ माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, शिवसेना तालुका प्रमुख अशिष ठोंबरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, शिवाजी असवले, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, सुदर्शन खांडगे, अमोल भेगडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच शकडो वऱ्हाडी मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भोजनाची व्यवस्था ही नियोजनबध्द होती. संस्थेचे हे विवाहसोहळ्याचे बारावे वर्ष आहे. सोहळ्याचे संयोजन विवाह सोहळा समिती अध्यक्ष बाळासाहेब येवले कार्यअध्यक्ष राजु देवकर उपाध्यक्ष अमोल हुलावळे ,सहसचिव नवनाथ मालुसरे,खजिनदार मदन नाणेकर,गणपत केदारी, संस्थापक भरत मोरे,दिपक हुलावळे, मिलिंद बोत्रे, मानद अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे,किरण हुलावळे सुरेश गायकवाड, नंदकुमार पदमुले ,रघूनाथ मराठे,गुलाब तिकोणे,अजय शिराली,मारुती देशमुख ,संजय देवकर,जितेंद्र बोत्रे, संभाजी येवले, मधुकर पडवळ ,बबनराव माने,तानाजी पडवळ,सोमनाथ जांभळे,साईनाथ मांडेकर, संजय खांडेभरड ,जगन आहेर,किरण येवले,वसंतराव माने,भरत येवले,मारुती येवले,संजय देवकर,अरुण भानुसघरे,संभाजी पो भानुसघरे,मनोज देशमुख,प्रकाश आगळमे,रोहिदास हुलावळे,अनिल गायकवाड,सागर जाधव,गणेश पडवळ,संतोष भानुसघरे,सुरेश कडु,संजय देवकर, विवेक सोपरकर,सुरेश केदारी,नवनाथ पडवळ,सुनिल शिर्के,ज्ञानेश्वर हुलावळे,सचिन वाडेकर,शाम गायकवाड,संतोष ढाकोळ,अनंता ढवळे,किसन राणे,भरत मानकर,बाळासाहेब आंबेकर, संतोष मोरे,मुरलीधर शिंदे,सर्जेराव गिरवले,मदन दाभाडे,प्रशांत हुलावळे,निरंजन बोत्रे,आकाश माने,तानाजी कुटे,राजु लालगुडे,संभाजी आहेर,शांताराम आहेर ,परशुराम येवले यांच्यासह कार्ला परिसरातील ग्रामस्थ आदींनी केले होते.

अधिक वाचा –
– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याचे आवाहन । Pune News
– कै. सोपानराव ( आण्णा ) म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ आज वडगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा । Vadgaon Maval
– राजकारणातील नवा ‘संजय’ छाननीत नापास ! मावळ लोकसभेसाठी दाखल 50 अर्जांपैकी 3 अर्ज बाद, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावात पोलिसांकडून भल्या पहाटेच कोम्बिंग ऑपरेशन, 40 गुन्हेगारांची झाडाझडती, काय असतं कोम्बिंग ऑपरेशन? वाचा । Talegaon Dabhade

Next Post

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी धरले अजितदादांचे पाय, नेमकं काय घडलं? वाचा । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Waghere Patil and Ajit Pawar met

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी धरले अजितदादांचे पाय, नेमकं काय घडलं? वाचा । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.