व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावात पोलिसांकडून भल्या पहाटेच कोम्बिंग ऑपरेशन, 40 गुन्हेगारांची झाडाझडती, काय असतं कोम्बिंग ऑपरेशन? वाचा । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे पोलिसांनी शुक्रवारी (दिनांक 26 एप्रिल) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये पोलिसांनी भल्या पहाटे 40 हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपींची चाचपणी करून त्यांच्याकडून बंधपत्र भरून घेतले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे पोलिसांनी शुक्रवारी (दिनांक 26 एप्रिल) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये पोलिसांनी भल्या पहाटे 40 हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपींची चाचपणी करून त्यांच्याकडून बंधपत्र भरून घेतले. लोकसभा निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कुरापती गुन्हेगारांची कुंडली काढली आहे. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

दरम्यान, शुक्रवारी पहाटे तीन ते सहा या कालावधीत तळेगाव दाभाडे पोलिसांनी हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. कोम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलिसांनी 40 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्या गुन्हेगारांकडून बंधपत्र भरून घेण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच एकाकडून कोयता शस्त्र जप्त केले आहे. मतीन अकबर कुरेशी याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ( Pimpri Chinchwad Talegaon Dabhade Police Combing Operation )

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्यासह तीन अधिकारी, गुन्हे प्रगटीकरण (डीबी) पथकातील अधिकारी आणि 17 अंमलदारांनी सहभाग घेतला.

कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे काय?
कोम्बिंग ऑपरेशन ही तशी लष्करी संज्ञा आहे. शत्रूचे कोणतेही लढाऊ शस्त्रे किंवा इतर संसाधने शोधण्यासाठी सैन्याने एखाद्या भागात ठरवून केलेली कारवाई असते. कोम्बिंग ऑपरेशनला स्वीप ऑपरेशन असेही म्हटले जाते. पोलिसांकडून सहसा लपलेल्या गुन्हेगारांचा शोध घेणे किंवा त्यांच्या शस्त्रसाठ्याचा शोध घेणे, यासाठी हे ऑपरेशन राबवले जाते. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एखाद्या विभागात किंवा संपूर्ण शहरात हे ऑपरेशन राबवले जाते. शहरातील हॉटस्पॉट निश्चित करून आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या यादीनुसार हे ऑपरेशन राबवले जाते.

अधिक वाचा –
– कै. सोपानराव ( आण्णा ) म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ आज वडगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा । Vadgaon Maval
– राजकारणातील नवा ‘संजय’ छाननीत नापास ! मावळ लोकसभेसाठी दाखल 50 अर्जांपैकी 3 अर्ज बाद, वाचा सविस्तर
– कामशेत येथे इनोव्हा कारचा भीषण अपघात ! सामुदायिक विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघींवर काळाचा घाला । Kamshet Accident

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग बसचा थरार – Video

Next Post

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद । Karla News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Community Wedding Ceremony

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.