Dainik Maval News : गेली कित्येक दिवस बैठकांच्या सत्रात अडकलेल्या भारतीय जनता पार्टी पक्ष आता मावळ तालुक्यात वेगाने पुढे जाताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपाने मावळ तालुक्यात चांदखेड गणातून आपला पहिला उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर सोमवारी आणखीन एका उमेदवाराचे नाव अधिकृतरित्या भाजपाकडून जाहीर करण्यात आले आहे.
सोमवारी ( दि. ३ नोव्हेंबर ) तळेगाव दाभाडे येथे शिवसेना उबाठा पक्षाचे सुरेश गायकवाड यांचा आणि रंजना सुरेश गायकवाड यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि पक्षाचे सर्वच प्रमुख तालुकास्तरीय नेते उपस्थित होते. यापक्षप्रवेशानंतर भाजपाकडून कोअर कमिटी सदस्य निवृत्ती शेटे यांनी रंजना सुरेश गायकवाड यांना कार्ला पंचायत समिती गणातून पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
रंजना गायकवाड या वेहेरगावच्या माजी सरपंच आणि सोसायटीच्या संचालक आहेत. तसेच त्यांचे पती हे प्रसिद्ध गाडा मालक आहेत. कार्ला पंचायत समिती गणात गायकवाड परिवाराचा मोठा नावलौकिक असून आता भाजपा पक्षप्रवेशामुळे भाजपाची ताकद त्यांच्या पाठीशी असणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


