Dainik Maval News : मावळ तालुक्यातील काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रभावी उमेदवार ज्ञानेश्वर दळवी यांनी नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. रविवारी ( दि. ९ नोव्हेंबर ) रोजी मुरलीधर मोहोळ यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त ज्ञानेश्वर दळवी यांनी श्री. मोहोळ यांची सदिच्छा भेट घेतली.
ज्ञानेश्वर दळवी हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी श्री. दळवी हे काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातून तयारी करीत आहेत. रविवारी ( दि. ९ ) केंद्रीय केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त श्री. दळवी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत श्री. मोहोळ यांची भेट घेेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्री. दळवी आणि श्री. मोहोळ यांच्यात सुसंवाद झाला. त्यामध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी माजी सभापती ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी हे तयारी करीत असून त्यांना जनसामान्यांचाही पाठींबा मिळत आहे, हे समजताच केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ यांनी ज्ञानेश्वर दळवी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काले – कुसगाव गटात दळवी यांच्या उमेदवारीची चर्चा
मावळ तालुक्यातील काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटात सध्या सर्वात प्रभावी उमेदवार म्हणून भाजपाचे ज्ञानेश्वर दळवी यांच्या नावाची चर्चा होत आहे. एक प्रामाणिक आणि सामान्यांच्या सेवेसाठी कायम धावून जाणारा नेता म्हणून ज्ञानेश्वर दळवी यांची ओळख आहे. दळवी हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून सामान्यांचा त्यांना पाठींबा मिळताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार
