व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता टोकाला जात असताना दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर पातळी सोडून टीका होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 7, 2022
in महाराष्ट्र
Atul-Bhatkhalkar-Tweet-on-Uddhav-Thackeray

Photo Courtesy : Twitter / Atul Bhatkhalkar


भारतीय जनता पार्टी ( BJP ) आणि शिवसेना ( Shiv Sena ) यांच्यातील संघर्ष आता टोकाला जात असताना दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर पातळी सोडून टीका होताना दिसत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि इतर सर्व निवडणूकांच्या अनुषंगाने या दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

“राजकारणात सगळे काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे. आता वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे,” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर ( Shiv Sena Uddhav Thackeray ) मुंबई दौऱ्यावर असताना हल्लाबोल केला होता.

त्यांच्या टीकेला शिवसेनेकडून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. “शिवसेना कोणाची, शिवसेना संपेल की राहील यावर एखादा तडीपार गुंड येथे येऊन मते मांडत असतील तर महाराष्ट्राचे कान इतके दुबळे नक्कीच नाहीत. महाराष्ट्र इतक्या दुबळ्या आणि हलक्या मनाचा नक्कीच नाही की तो आपला सद्सदविवेक हरवून एखाद्या तडीपार गुंडाचे म्हणणे ऐकेल. शिवसेना कालही होती शिवसेना आजही आहे. शिवसेना उद्याही राहील.” असे अंधारे यांनी ठणकावून सांगितले.

अंधारे यांच्या गृहमंत्री शहा यांच्याबद्दलच्या ‘तडीपार गुंड’ या शब्दांनी क्रोधित झालेल्या अतुल भातखळकर ( BJP Atul Bhatkhalkar ) यांनीही आता थेट उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

सत्ता गमावल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही…
बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओ मध्ये फोटो काढत बसावे लागले असते. pic.twitter.com/oicHch6dqa

— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) September 7, 2022

बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी… – भातखळकर यांचे ट्विट

“सत्ता गमावल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही… बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओ मध्ये फोटो काढत बसावे लागले असते.” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. ( BJP Atul Bhatkhalkar Criticizes Shiv Sena Uddhav Thackeray Through Tweet )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक वाचा –
गॅस सिलिंडरबाबत गुड न्यूज! लवकरच होणार स्वस्त, वाचा अधिक
मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी, वाचा एका क्लिकवर


dainik maval jahirat

Previous Post

गॅस सिलिंडरबाबत गुड न्यूज! लवकरच होणार स्वस्त, वाचा अधिक

Next Post

मोठी बातमी! राज्यातील तब्बल 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Grampanchayat-Election-In-Maharashtra

मोठी बातमी! राज्यातील तब्बल 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.